Mandangad : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा केल्या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील वेसवी ते देव्हारे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने व्हॅन पार्क केली. याप्रकरणी चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सोमवार २२ डिसेंबर रोजी दुपारी ११.४५ वा. सुमारास करण्यात आली. अहमद अब्बास खोपटकर (३५, रा. शिपोळे बंदर ता. मंडणगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस अंमलदार आजर शेख यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी अहमद खोपटकरने आपल्या ताब्यातील जितो व्हॅन (एमएच-०८-एएन-२३९१) ही वेसवी ते देव्हारे जाणाऱ्या रस्त्यावरील वेसवी नाका येथे इतर वाहनांना व पादचारींना अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने उभे केले होते. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 24/Dec/2025