Chiplun : नॅब आय हॉस्पिटलला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची भेट

चिपळूण : नॅब आय हॉस्पिटल चिपळूणला पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी भेट दिली. भेटीप्रसंगी डॉ. तात्याराव लहाने यांना अध्यक्ष नीलेश भुरण यांनी आतापर्यंतच्या ७८ हजार झालेल्या शस्त्रकियांची माहिती दिली. याबाबत डॉ. लहाने यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी नॅबच्या वतीने नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी डॉ. तात्याराव लहाने यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव भारत नांदगावकर, संचालक अॅड. विवेक रेळेकर, प्रकाश पाथरे, सोनाली खर्चे, राधिका पाथरे, अॅड. थरवळ, डॉ. अमित खेडेकर, डॉ. ऋचा भिडे, डॉ. जान्हवी देसाई, डॉ. पुष्कराज नारखेडे व सहकारी उपस्थित होते. यावेळी नॅब आय हॉस्पिटलचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 24/Dec/2025