लोटे : सोनगाव (ता. खेड) येथे होणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी शिवसेना उबाठाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख अरुणा आंब्रे, तालुकाप्रमुख अंकुश काते, तालुका सचिव संदीप कदम, युवा सेना तालुकाप्रमुख डॉ. मच्छिंद्र गोवळकर, महिला तालुका संघटिका संजीवनी नरळकर, उपतालुकाप्रमुख विजय साळुंखे, विभागप्रमुख राजेंद्र घाग, सोनगाव सरपंच भारती पडवळ, उपसरपंच मिलिंद घोरपडे, शाखाप्रमुख संजय खेराडे, दीपक घाग, उपविभाग प्रमुख नंदु कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शेखर मोरे, समृद्धी जाधव, रेवा खेराडे, निशा खेराडे, निकिता किजबिले आदी उपस्थित होते. या कामासाठी ४ कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 24/Dec/2025














