चिपळूण : तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ रोजी सकाळी घटस्थापना व विधिवत वीणा पूजन करून तसेच वीणा चढवून हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त काकड आरती, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, रात्री हरी जागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहाची सांगता १ जानेवारी रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनाने करण्यात येईल. या दिवशी दुपारी १२ ते १ या वेळेत हंडी फोडून काला करण्यात येईल व घट हलवून विधिवत पूजा करून वीणा उतरविला जाईल. सर्व ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 24/Dec/2025














