रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी घारपुरेवाडी येथील नदीवर मोठा बंधारा बांधण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला. याच प्रकारचे एकूण 7 बंधारे बांधण्याचा ग्रामस्थ व बचत गटाच्या सदस्यांनी निर्णय घेतला आहे. सदर बंधारा बांधण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते.
श्री संतोष बारगोडे सरपंच, श्रीमती ज्योती मयेकर ग्रामपंचायत सदस्य, सौ अनुजा धावडे सदस्य, सौ. दिया कांबळे सदस्य, श्री सातपुतेसाहेब जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी, श्री कोडोलकर कृषी अधिकारी, श्री देविदास इंगळे ग्रामपंचायत अधिकारी, सौ. समृद्धी सोनार CRP, माजी सरपंच सौ. सुरभी शितप, ग्रामपंचायत कर्मचारी सूरज इरमल, यश लिंगायत, मयुरी भोसले, आणि घारपुरे वाडीतील बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 24/Dec/2025














