Mandangad : राजेश इंगळे यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक

मंडणगड : तालुका विकास मंडळ, मुंबई संचालित पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक राजेश इंगळे यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळविले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ पुणे व विद्यासमिती यांच्यावतीने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर निबंध स्पर्धा राबविली जाते. तालुकास्तरावर प्रा. राजेश इंगळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. जिल्ह्यात ७ निबंधातून पुन्हा त्यांच्या निबंधाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची राज्यस्तरावर निवड झाल्यानंतर राज्यस्तरावर त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 24/Dec/2025