Ratnagiri : मालगुंड ते निवेंडी येथील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड ते निवेंडी जाणाऱ्या रस्त्यावरील पऱ्याच्या किनारी दारू पिणाऱ्या प्रौढांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अशोक मयेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी निवेंडी जाणाऱ्या रस्त्यावरील पऱ्याच्या किनारी निदर्शनास आली.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आझाद मैदान येथील शासकीय गोदामाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सातेरी मिलगे असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मडके यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 24/Dec/2025