संगमेश्वर : तालुक्यातील भोवडे गावचे पोलीस पाटील प्रदीप गणपत अडबल यांनी केलेल्या १७ वर्षाच्या सेवेची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्ताराम बगाटे यांनी घेऊन त्यांना सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील पाच पोलीस पाटलांचा त्यांच्या कार्य कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रदीप अडबल हे भोवडे गावा बरोबरच किरबेट नऊ वर्षे देवडे सात वर्षे व वाडीआधीष्टी चार वर्षे असा तीन गावांचा अतिरिक्त कारभार विना मोबदला करत आहेत. या चारही गावात शांतता व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेऊन गावातील तंटे गावातच मिटवण्यास अधिक प्राधान्य दिले आहे. तर प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मदतीला धावून त्यांचे प्रश्न सोडवून न्यायदान करण्याचे यशस्वी काम केले आहे. कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ जनहित जपणारे अशी त्यांची ओळख असून, त्यांचा झालेला सत्कार गावाची शान उंचवणारी आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 24/Dec/2025














