खेड : खेड-भरणे हा राज्यमार्ग असून या राज्यमार्गावर भरणे ग्रामपंचायतीच्या आशिर्वादाने दुकाने थाटली जात आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे देखील अशीच अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत. या बांधकांमाना कुणाचा आशिर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीकडे या संदर्भात विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, हायवे नजीकच्या बांधकामांवर कल्याण टोलवेज कंपनी आणि प्रांताधिकारी यांनी याकडे गांभियनि लक्ष देणे आवश्यक आहे. २५ पासून ख्रिसमस व नववर्षारंभच्या निमित्ताने लाखो पर्यटक या मार्गावरून मार्गक्रमण करत असतात त्यामुळे तातडीने कारवाई न केल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची
भीती आहे.
मुंबई गोवा महामागार्लंगत केंद्रसरकारने सव्हीर्स रोड व पावसाळी नाले उभारण्यासाठी संपादित केलेल्या जमिनीवर गेल्या वर्षभरात अनेक पत्र्याचे खोके व दोन मजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. परिणामी सर्व्हिस रोड अरुंद राहिले असून दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी व लहान मोठे अपघात होत आहेत. खेड दापोलीकडे जाण्यासाठी राज्यमार्ग खेड भरणे असा अस्तित्वात आहे. या मार्गाचे भरणे ते अण्णाचा पर्या इथपर्यंतचा भाग भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. या भागात रस्त्याच्या बाजूपट्टीवर रस्त्या लगतच्या गटारावर व थेट रस्त्यावर काही जणांनी दुकाने थाटून व्यावसाय सुरू केले आहेत. काही वर्षापूर्वी हा मार्ग अरुंद असल्याने सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काहींनी रस्त्याच्या बाजूला मोकळ्या झालेल्या जागेचा आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून वापर करण्यास सुरवात केली आहे. सध्या रस्त्याच्या काँक्रीटीकण म सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजूला कृषी विभागाची नर्सरी तर दुसऱ्या बाजूला अनेक बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत.
परिणामी या ठिकाणी अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते. मुंबई-गोवा महामार्गालगत जोडलेला खेड दापोलीकडे जाणारा हा रस्ता असुन, पर्यटक व अन्य प्रवासी वाहने या मार्गावरूनच ये-जा करतात. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये काही स्थानिक व परप्रांतिय व्यावसायिकांनी या ठिकाणी दुकाने थाटून आपले बस्तान मांडले आहे. धोकादायक पद्धतीने ही दुकाने थाटलेली असल्याने व त्याठिकाणी खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची वाहने थांबत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानदारांना भरणे ग्रामपंचायतीकडून फिरत्या व्यावसायाच्या पावत्या फाडल्या जात असल्याची बाब निर्दशनास आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा भरणे ग्रामपंचायत व्यवसायासाठी देत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
भरणे-खेड मार्गालगत दुकाने थाटू देणार नाही : बांधकाम अधिकारी
भरणे-खेड रस्त्यालगत अनधिकृतरित्य व्यवसाय करणाऱ्यांना आम्ही तातडीने हटवणार आहोत. त्यांना यापूर्वी अनेक वेळा सुचना केलेल्या आहेत. रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण सुरू आहे. रस्त्यालगत यापुढे दुकाने थाटू देणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सूचना करून त्यांनी त्यांची दुकाने न हटविल्यास त्यांच्या सर्व व्यवसाय साहित्यासह इतर वस्तू जप्त करण्यात येतील व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रीया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नीलेश पावशे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 25/Dec/2025














