रत्नागिरी : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर – १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे किशोरी व किशोर संघ मुंबईला रवाना झाले आहेत.
किशोरी संघाच्या कर्णधार पदी मीरा कामतेकर, तर किशोर संघाचा कर्णधार प्रयाग नामये यांची निवड झाली. लांजा येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून किशोर व किशोरी संघाची निवड करण्यात आली आहे. किशोरी संघ ः मीरा कामतेकर (कर्णधार), स्वरा साळुखे, विधी सावंत, परी सुफल, मानवी शिगवण, विभूती मेत्री, ओवी वाडेकर, स्वरा उपशेट्ये, विधी रहाटे, मिहीका मोरे, आराध्या माने, आश्लेषा पड्ये, पौर्णिमा दरडे, सात्विका कांबळे, चैत्राली दीक्षित. पंकज चवंडे (प्रशिक्षक), साक्षी डाफळे (संघ व्यवस्थापक). किशोर संघ ः प्रयाग नामये (कर्णधार), सोहम इंगळे, आयुष इंगळे, उमेश इंगळे, चिराग पाटोळे, श्लोक मांडवकर, पार्थ लांजेकर, यशराज कांबळे, आदित्य माटल, यश मांडवकर, गणेश खामकर (लांजा), नयन बुरटे, श्रेयस कदम (चिपळूण), शाश्वत डोर्लेकर (गुहागर), विनायक मटकर (राजापूर). चेतन सनगले (प्रशिक्षक), विजय पाटोळे (संघ व्यवस्थापक).
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 25-12-2025














