रत्नागिरी : तालुक्यातील साठरेबांबर आणि आरे समुद्रकिनारी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ ते ७वा. कालावधीत करण्यात आली आहे.
तुकाराम सदु खाकम (५०, रा. साठरेबांबर तेरेकरवाडी, रत्नागिरी) आणि संतोष यशवंत मयेकर (५२, रा. काळबादेवी मयेकरवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांविरोधात पोलिस कॉस्टेबल सुर्याजी पाटील आणि प्रशांत बंडबे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील तुकाराम खाकम हा साठरेबांबर-भराडीनवाडी येथे रस्त्याच्या बाजुला आंब्याच्या झाडाखाली तर संतोष मयेकर हा आरे समुद्रकिनारी आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 25/Dec/2025














