लांजा : मणक्याच्या आजाराला कंटाळून एका ३४ वर्षीय युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी लांजा तालुक्यातील कुरचुंब येथे उघडकीस आली. संदेश मनोहर पाष्टे (३४ वर्षे, रा. कुरूचुंब, ता. लांजा) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संदेश पाष्टे याला मणक्याचा आजार होता. आजाराने सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून संदेश याने घरात कुणी नसताना बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या दरम्यान घरातील लोखंडी बाराला नायलॉच्या रसिने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे मृत संदेश पाष्टे याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 25/Dec/2025














