चिपळूण नगर परिषदेच्या नव्या इमारतीसाठी ११ कोटींचा निधी मंजूर

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी शासनाकडून एक महिन्यात निधी उपलब्ध करून देईन असे ४८ तासांपूर्वी बोललो होतो. मात्र, आज प्रत्यक्षात ४८ तासांपूर्वीच न.प.ला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचा जी.आर. थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आणला आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे जाहीर केले.

साने गुरुजी उद्यानातील पूज्य साने गुरुजी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. त्यांच्या हस्ते साने गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण झाले. ना. उदय सामंत म्हणाले, सव्वाशेव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा विशेष आनंद होत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा विशेष आनंद होत आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मुख्यमंत्री फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने ११ कोटीचा निधी आणला आहे. त्याचा जी. आर. सोबत आहे. वर्षभरानंतर साने गुरुजींच्या १२६ व्या जयंतीदिनी बांधलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन करू. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आणू. आणि त्याच दिवशी ज्यादा निधीची मागणी करू. अंतर्गत फर्निचरसाठी जो खर्च लागेल तो एक कोटी खर्च जिल्हा नियोजन मधून करण्यात येईल. शहर विकासासाठी आवश्यक सर्व निधीचे नियोजन करताना युतीच्या नगरसेवकांना सोबत घेऊन प्रत्येक वॉर्डात कोणते काम करायचे आहे, टप्प्यानेटप्प्याने निधी उपलब्ध करून देणार आहोत. विकासासाठी निधी देऊ. मात्र, टक्केवारीसाठी भांडू नको, असा टोमणा पालकमंत्र्यांनी मारला.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी, साने गुरुर्जीची १२५वी जयंती आहे आणि आजच्याच दिवशी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचा नगराध्यक्ष म्हणून पहिला मान मिळाला आहे. गुरुजींनी चिपळुणात स्वातंत्र्यपूर्व काळात शहरातील विरेश्वर मंदिर सर्वधर्मियांस खुले करून तेथेच भोजन केले. चिपळूणवासीयांनी मला आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. याचा मला आनंद होत आहे. यावेळी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 25/Dec/2025