खेड : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खेड (रत्नागिरी) यांच्या वतीने खनिजांच्या विश्वात (In the World of Minerals) या प्रदर्शनाचे आयोजन ३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची खनिजे तसेच दगडांचे आकर्षक आणि अभ्यासपूर्ण नमुने सादर करण्यात येणार असून, दगडात दडलेले विज्ञान समजून घ्या या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे प्रदर्शन घरडा वाचनालय, पी. एन. जी. शोरूम समोर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, चिपळूण येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
खनिजांचे विविध प्रकार, त्यांची निर्मिती प्रक्रिया, त्यांचा उपयोग तसेच भौगोलिक महत्त्व याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष नमुन्यांद्वारे अध्ययनाची संधी मिळणार असल्याने हे प्रदर्शन शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रदर्शनास नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील तसेच स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. वाय. आर. कुळकर्णी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 25/Dec/2025














