Ratnagiri : मद्याच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेला तरुण रुग्णालयात

रत्नागिरी : सेंट्रिंगचे काम करणाऱ्या विहार येथील तरुणाने मद्याच्या नशेत उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ब्रिजेश बुटी चौधरी (२८, सध्या रा. एसटी बसस्थानक जवळ, साखरपा, ता. संगमेश्वर मूळ : माधवपूर, तरवारा जि. शिवान राज्य बिहार) असे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. सुमारास साखरपा येथे घडली. बिहारी तरुणाने मद्याच्या नशेत उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्याला तातडीने साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 25/Dec/2025