गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने भरघोस यश मिळवून सत्ता आणली. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे दोन व भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार पराभूत झाले. हा पराभव विचार करायला लावणारा आहे. युतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांमुळे हा पराभव झाला असून, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई न केल्यास पुढील काळात युती टिकवणे अवघड होईल याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या उमेदवाराचा मुलगा भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभा होता. हे सर्व युतीच्या संकेताला धरून नव्हते व युतीची नियमावली तुडवून होत असणारे काम होते. मात्र निवडणूक होईपर्यंत युतीमध्ये बेबनाव होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत युतीच्या वरिष्ठांकडे योग्यप्रकारे निरोप पोहोचवला होता; पण यावर कोणतीच कारवाई झाली नाही व त्या वॉर्डामध्ये एकमेकाला युतीच्या विरोधात मदत करण्याचे काम झाले. युतीच्या काही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्याचे फायदे इतर पक्षातले अनेकजण उठवत असतात, असे नातू म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 25/Dec/2025














