देवरुख : निगुडवाडी गावातील ग्रामस्थ आणि संकेत राजेंद्र गुरव यांच्या सहवासात असणारे रत्नागिरी फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून निगुडवाडी येथील किल्ले महिमतगडावर स्वच्छता व श्रमदान मोहीम राबवण्यात आली.
यावेळी गडावरील कोणत्याही मूळ वास्तूला धक्का न लावता स्वच्छता व श्रमदान करून वास्तू जतन करण्याचे कार्य करण्यात आले. या मोहिमेत २० दुर्गप्रेमींचा सहभाग होता. किल्ले महिमतगडावर वेळोवेळी निगुडवाडीच्या ग्रामस्थांतर्फे स्वच्छता व श्रमदान मोहीम राबवून किल्ल्याचे संवर्धन केले जाते. किल्ल्याला पर्यटकांनी भेट द्यावी हे ध्येय उराशी बाळगून सातत्याने मोहीम, उत्सव व उपक्रम राबवण्यात येतात.
या मोहिमेमध्ये गडाचे बुरूज, तटबंदी, मंदिर परिसर, प्रवेशद्वार व गडाकडे जाण्याचा बहुतांश मार्ग यांची उत्तमरीत्या स्वच्छता करण्यात आली. यामुळे या गडाकडे जाण्याचा मार्ग पर्यटकांसाठी आता खुला करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 25/Dec/2025














