Mandangad Science Exhibition : ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नीलेश लोखंडे यांच्या प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड

मंडणगड : तालुक्यातील लाटवण पंचक्रोशी हायस्कूलमध्ये आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिडे आदिवासीवाडी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षक नीलेश लोखंडे यांनी प्राथमिक शिक्षक गटात यश मिळविले आहे. या यशामुळे त्यांच्या प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

लोखंडे यांनी ‘मनोरंजन गणितीय मॉडेल’ या विषयास अनुसरून संख्यांची गंमत, गणितीय टीव्ही, जादुई पाटी, मूळ संख्या शोधा असे मॉडेल तयार केले होते. या यशानंतर त्यांच्या मॉडेलची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 25/Dec/2025