Chiplun : असुर्डेत महिला प्रभाग संघ इमारतीचे भूमिपूजन

चिपळूण : असुर्डे (ता. चिपळूण) येथे ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या महिला प्रभाग संघ कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम व माजी सभापती पूजा निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले, महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर गावाचा विकास आपोआप घडतो. महिला प्रभागसंघ कार्यालयाची नवीन इमारत ही केवळ भिंतींची रचना नसून ती महिलांच्या आत्मविश्वासाची, स्वावलंबनाची पायाभरणी आहे.

उर्जा महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा राजश्री ओकटे, प्रभाग संघ सचिव श्रद्धा नरोटे, कोषाध्यक्ष उज्ज्वला जगदाळे यांनी महिला सहभागाबाबत भूमिका मांडली. यावेळी सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप जाधव, प्रज्ञा धनावडे, ग्रामसेवक भागवत, काटकर, सारिका नरोटे, अक्षता बने, प्रिया बने आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 25/Dec/2025