Sangameshwar : उजगावात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

साडवली : आदर्श महिला स्नेही पंचायत अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील बौद्ध विहार, ग्रामपंचायत उजगाव येथे रविवारी किशोरवयीन मुली व युवतींसाठी लिंगभाव समानता या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात लक्ष्यवेधी फाऊंडेशनच्या अध्यक्ष तसेच यशदा प्रशिक्षक मा. चैत्राली शेलार धस यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण सत्रामध्ये गटचर्चा, सादरीकरण, सद्यस्थितीवर आधारित चर्चासत्र, समाजाच्या मुलींकडून असणाऱ्या अपेक्षा व त्याचे परिणाम, समाजाकडून मुलींना असणाऱ्या अपेक्षा, तसेच मुलींचे हक्क व जबाबदाऱ्या अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहभागी मुली व युवतींनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपले अनुभव आणि विचार व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले विचार मंचची स्थापना करण्यात आली. यावेळी ग्रामसंघ अध्यक्ष सुहासिनी पांचाळ, अंगणवाडी सेविका स्वाती सावंत, तनुजा बडद, आशा कार्यकर्ती दक्षता सावंत, आशा बडद, प्रणिता बडद आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 25/Dec/2025