राज्य तायक्वांदोसाठी संगमेश्वरचे खेळाडू करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

देवरुख : तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा होणार असून यात संगमेश्वर तालुक्यातील तायक्वांदोपटूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग-कुडाळ येथील उद्यमनगरमधील वासुदेव हॉलमध्ये २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या देवरुख नगरपंचायत तायक्वांदो क्लबचे खेळाडू फाईटमधून लक्ष्मी मोघे ऋतिक कांगणे, सोमांश सावंत, दुर्गा मोघे हे खेळाडू जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंचा शुभेच्छा कार्यक्रम नगरपंचायत तायक्वांदो क्लबमध्ये क्लब उपाध्यक्ष अॅड. पूनम चव्हाण, संदेश जागुष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 25/Dec/2025