दापोली : तालुक्यातील आडे-उटंबर खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून लगतची वस्ती धोक्यात आली आहे. येथील नागरिकांवर उपासमारीची परिस्थिती उदभवली आहे. प्रशासनाने हा गाळ तत्काळ काढून गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.गाळ साचल्यामुळे येथील खाडीमध्ये ये-जा करणार्या मच्छिमार बोटी अडकून पडत असून त्या बाहेर कशा काढायच्या असा प्रश्न मच्छिमार बांधवांना पडला आहे. खाड किनारी घरे तसेच बागायती आहेत. तेथे वस्ती आहे. त्यांना खाडीत गाळ साचल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. याबरोबर आडे-उटंबर खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या खाडीमध्ये मच्छिमार बोटी खाडी किनारी उभ्या न करता समुद्रात उभ्या कराव्या लागत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 26/Oct/2024














