गुहागर : गुहागर बीट स्तरीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम गुहागर येथील ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मंदिर जवळील परशुराम क्रीडा नगरी येथे गुहागरचे मुख्याधिकारी माननीय स्वप्निल चव्हाण यांचे शुभ हस्ते श्री सरस्वती देवी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वला करून अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुहागरचे बीट विस्तार अधिकारी श्री महेंद्र वळवी हे होते. सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गुहागर केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुहागरचे केंद्रप्रमुख श्री ईश्वर वसावे यांनी केले. त्यावेळी अंजनवेलच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण माजी नगराध्यक्ष सौ स्नेहा भागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर भागडे, शिक्षक पतपेढीचे , उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक चंद्रकांत झगडे, माजी उपाध्यक्ष सुभाष गमरे, श्री गणपत निंबरे, निलेश खामकर, डॉ मनोज पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे अमोल धुमाळ, संजय आवटे, रमेश शिंदे, नदीम कोतवडेकर, मनोज नाखरे, दीपक रामाने, मृणाल झगडे, स्नेहा नार्वेकर मॅडम, संजना पवार, प्रभू हंबर्डे, मदन गीजयें, निलेश पाटील, रांजणे सर, नेहा जोगळेकर, मानसी जोशी, गुहागर अंजनवेल पाठ पन्हाळे साखरी बुद्रुक या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रस्तरावर विजयी झालेले संघातील विद्यार्थी व प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी चव्हाण साहेब, यांचे हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले गेले. किरण ढोणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त क्रीडा ज्योतीचे संचलन केले व मान्यवरांना अभिवादन केले. मुख्याधिकारी चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते क्रीडा नगरीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याधिकारी स्वप्निल धुमाळ साहेब म्हणाले की शिस्त व सातत्यपूर्ण सराव यामुळेच आपल्याला क्रीडा स्पर्धेत व जीवनात सुयश प्राप्त होते. विद्यार्थ्याने खिलाडू वृत्तीने क्रीडा नैपुण्य दाखवावे व चमकदार कामगिरी करावी, नगरपंचायत हद्दीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज सर्व सुविधा युक्त क्रीडांगण निर्मिती करणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे, भविष्यातील केंद्र स्तर, बीट स्तर, तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धा याच मैदानात होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वळवी सर म्हणाले की कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुहागर केंद्रातील सर्व शिक्षक एकजुटीने प्रयत्नशील असून त्यामुळे या क्रीडा स्पर्धा यशस्वी होऊ शकल्या आहेत. यासाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती व केंद्रातील शिक्षक यांचे योगदान बहुमोलाचे आहे. त्यानंतर सर्व विभाग प्रमुख यांना क्रीडा फाईल यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते फाईल वितरण करण्यात आले. मोठा गट, मुले कबड्डी अंजनवेल केंद्र व गुहागर केंद्र यांच्या दरम्यान झालेल्या उद्घाटन सामन्याचे उद्घाटन श्रीफळ वाढवून मुख्याधिकारी चव्हाण यांनी केले आभार प्रदर्शन ईश्वर हलगरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे शानदार असे सूत्रसंचालन श्री राजू जानू सुर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुहागर केंद्रातील सर्व शिक्षक यांनी अल्पावधीत विशेष योगदान दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 25/Dec/2025














