Sangameshwar : माखजन ग्रामपंचायत मार्फत भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न

माखजन : जेवढा पावसाळा तेवढाच उन्हाळा अशी नैसर्गिक परिस्थिती असल्याने, कोकणातील समुद्र किनारे व नद्यांपासून दूर असणाऱ्या गावांमधील भूजल पातळी पावसाळा संपला की झपाट्याने खाली गेलेली पाहायला मिळते. याचा नियमित परिणाम विहिरी व कुपनलिकेच्या पाणी पातळीत पाहायला मिळते.

ही पाणी पातळी वाढावी म्हणून माखजन ग्रामपंचतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने, माखजन वाणी आळी मध्ये असलेल्या बोअरवेल च्या सभोंवताली पाणी अडवून व पाणी जिरवून , भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बोअरवेल पुनर्जीवीत करण्याकामी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ सचिन धर्माधिकारी प्रतिष्ठान चे दास यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच महेश बाष्टे, व अन्य सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. भूजलं पातळी वाढवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 25/Dec/2025