Chiplun : सुशासन सप्ताहाद्वारे रिगल कॉलेजमध्ये ‘प्रशासन गाव की और’ कार्यक्रम

चिपळूण : रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेण्ट & टुरिझम, कोंढे, चिपळूण येथे केंद्र शासनाचा सुशासन सप्ताहाद्वारे “प्रशासन गाव की और” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी रितेश सोनावणे प्रकल्प अधिकारी बार्टी पुणे येथील आशिष कांबळे तसेच तालुका समन्वयक, सामाजिक न्याय विभाग अमोल पाटील आले होते. बीकॉम विभागात प्रा. पूनम गुरव यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी प्रशासन गाव की और या कार्यक्रमाद्वारे जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा घेतली.

या कार्यशाळेत तालुका समन्वयक सामाजिक न्याय विभाग यांमार्फत आलेले अमोल पाटील यांनी विविध शिष्यवृत्ती बाबत माहिती करून दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना व हॉस्टेल सुविधा यांसाठी हि अनेक योजना असतात. त्या देखील माहित करून दिल्या. या कार्यशाळेत शिष्यवृत्ती साठी महा DBT ह्या पोर्टल चा त्यांनी उल्लेख केला. या पोर्टलद्वारे विविध योजनांचा विद्यार्थ्यांना कसा लाभ घेता येईल. हे देखील त्यांनी सांगितले. या त्यांनी पुढील काही शिष्यवृत्तीची माहिती सांगितली.

त्यात १) भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती २) शिक्षण शुल्क व परीक्षा (फ्री शीप) योजना ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यांची माहिती दिली. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले.

या स्कॉलरशिपसाठी कोण पात्र असते त्यासाठी च्या आवश्यक कागदपत्रांची हि त्यांनी माहिती करून दिली. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती त्याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित सुखटणकर यांनी केले व शेवटी प्रा. अजिंक्य शिंदे यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 25/Dec/2025