Ratnagiri : ई-पीक पाहणीची ७ जानेवारीपर्यंत ग्रामस्तरीय समितीकडून पाहणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे खरीप हंगाम २०२५ च्या ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता ऑफलाईन पाहणी करून नोंद घेतली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याला ग्रामस्तरीय समितीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करा आणि २५ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत ग्रामस्तरीय समिती पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.

या समितीत शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑनलाईन नोंदणी करू न शकलेल्या शेतऱ्यांसाठी ग्रामस्तरीय समितीद्वारे शेतात जाऊन पाहणी केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी २४ डिसेंबरपर्यंत अर्ज करावे तसेच ७ जानेवारीपर्यंत समिती पाहणीसाठी येणार असून त्यांनतर अहवाल सादर केला जाणार आहे. ऑफलाईन ई-पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा संबंधित कृषी सहायकांशी संपर्क साधावा लागेल. तलाठी किंवा कृषी सहायक शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती घेवून ती नोंदवतील. यामध्ये पिकाचे नाव, लागवडीची तारीख, क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार यासाठी अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

पीक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो, पीक विमा आणि नुकसानभरपाईसाठी मदत होते. तसेच सरकारला कृषी धोरणे बनवण्यासाठी आणि पीक उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी अचूक माहिती मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होते आणि पारदर्शकता येते.

काय आहे ई-पीक पाहणी
ज्यामध्ये शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांची माहिती मोबाईल अॅपद्वारे स्वता डिजिटल स्वरूपात नोंदवतात. ज्यामुळे पीकविमा, अनुदान आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळविणे सोपे होते आणि शासनाला अचूक माहिती मिळते, ज्यामुळे पारदर्शकता येते. शेतातील पिकांची माहिती, गट क्रमांक, पिकांचा फोटो अपलोड करायचा असत्तो.

ही कागदपत्रे आवश्यक…
ई-पीक पाहणीसाठी प्रामुख्याने सातबारा उतारा, आधार कार्ड आणि शेतातल्या पिकांचे फोटो हे तयार ठेवावे लागतील. ही प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारे होते. शेतातील पिंकांची अचूक माहिती, गट क्रमांक आणि पिकांचा फोटो काढून अपलोड करायचा असतो, जेणेकरून पीकविमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 25/Dec/2025