रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २६) शहर, तालुका आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी उदय सामंत यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून अभिषेक व प्रार्थना केली जाणार आहे. या निमित्ताने गुरुवारी (ता. २५) नगरसेवक निमेश नायर व मित्रपरिवाराकडून हॅप्पी स्ट्रीट हा कार्यक्रम सायंकाळी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहासमोर झाला.
शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना सकाळी अकरा वाजता फळवाटप होणार आहे. साडेअकरा वाजता रिमांडहोम रत्नागिरी येथे मुलांना खाऊ चॉकलेट, बिस्कीट व गरजेच्या वस्तू वाटप, प्रभाग क्र. ६ मधील शिवसेना-भाजप पदाधिकारी व नूतन नगरसेवक राजू कीर, मेधा कुळकर्णी यांच्यातर्फे आशादीप मतिमुलांच्या वसतिगृहामध्ये ब्लॅंकेट वाटप केले जाणार आहे. तसेच स्वच्छता अभियान उपक्रम, घरोघरी नळकनेक्शन गळती दुरूस्ती, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी शौचालयाच्या पाईपला जाळी बसवणे, डासप्रतिबंधक धूरफवारणी केली जाणार आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित भगवान महादव सांबरे रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 26-12-2025














