रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री वाढदिवसानिमित्त यांच्या शहर शिवसेनेने शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पालकमंत्र्यांच्या यश आणि आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी दरवर्षी शहर शिवसेनेकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शुक्रवारी वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री भैरी देवाला अभिषेक करून प्रार्थना केली जाणार आहे. आरोग्य शिबिरासह मनोरंजन आणि सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत.
ग्रामदैवत श्री भैरी देवाच्या मंदिरात सकाळी १०.३० वा. अभिषेक आणि प्रार्थना केली जाणार आहे. पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खालची आळी येथील श्री भैरी देव मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी केले आहे. त्यानंतर सकाळी ११ वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात फळ वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर सकाळी ११.३० वा. रिमांड होम येथील मुलांना रोजच्या गरजेच्या वस्तुंसह चॉकलेट-बिस्किट आदी खाउ वाटप होणार आहे. शहरात इतरही पदाधिकारी उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. पालकमंत्र्यांचा ५० वा वाढदिवस असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांची विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी गेल्या काही दिवसांपासून धावपळ सुरु होती. गुरुवारी मारुती मंदिर परिसरात नूतन नगरसेवक निमेश नायर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘हैपी स्ट्रिट’चे आयोजन केले होते. छोट्या मित्रांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच आरोग्य शिबिरही पार पडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 26/Dec/2025














