रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बोंबलेवाडी रस्त्याच्या कडेला जंमलमय भागात मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आली. दिलीप वासुदेव चव्हाण (५०, रा. मराठवाडी चरवेली, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल लक्ष्मण कोकरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी संशयित हा बोंबलेवाडी येथील जंगलमय भागात दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 26/Dec/2025














