रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर फाटा येथील प्रवासी शेडमध्ये देशी दारू विनापरवाना आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार २४ डिसेंबर रोजी दुपारी २.२० वा. सुमारास करण्यात आली. सुनील धोंडू बंडबे (३६, रा. खानवली चिंचवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार विनोद कदम यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, बुधवारी दुपारी संशयित हा आपल्या ताब्यात २ हजार ८० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या ३१ बाटल्या विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 26/Dec/2025














