आराध्या कोळंबेकर हिचे यश कौतुकास्पद : नितीन गवारे

मंडणगड : रत्नागिरी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या तायक्वांदोपटे आराध्या कोळंबेकर हिचे यश हे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायक असून मंडणगडसाठी गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी केले.

आराध्या कोळंबेकर हिने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या बद्दल मंडणगड तालुका तायक्वांदो अकॅडमीच्यावतीने भोसले प्लाझा येथे २४ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात श्री. गवारे बोलत होते. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने ३५ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा सुवर्णपदक विजेती खेळाडू आराध्या कोळंबेकरची निवड झाली. ही स्पर्धा कुडाळ येथे २६ ते २८ डिसेंबर रोजी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 26/Dec/2025