राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधी शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीमधून बीडमधील सस्पेन्स संपला असून येथून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. इतर उमेदवारांची नावे आज रात्री किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं. आमच्यातील सर्वोत्तम आणि जास्तीत जास्त मतदान घेऊन निवडून येतील असा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी

1. 16 एरंडोल सतीश अण्णा पाटील
2. 111 गंगापूर सतीश चव्हाण
3. 135 शहापूर पांडुरंग बरोरा
4. 243 परांडा राहुल मोटे
5. 230 बीड संदीप क्षीरसागर
6. 44 आर्वी मयुरा काळे
7. 116 बागलान दीपिका चव्हाण
8. 119 येवला माणिकराव शिंदे
9. 120 सिन्नर उदय सांगळे
10. 122 दिंडोरी सुनीता चारोस्कर
11. 123 नाशिक पूर्व गणेश गीते
12. 141 उल्हासनगर ओमी कलानी
13. 195 जुन्नर सत्यशील शेरकर
14. 206 पिंपरी सुलक्षणा शीलवंत
15. 211 खडकवासला सचिन दोडके
16. 212 पर्वती अश्विनीताई कदम
17. 216 अकोले श्री अमित भांगरे
18. 225 अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर
19. 254 माळशिरस उत्तमराव जानकर
20. 255 फलटण दीपक चव्हाण
21. 271 चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. 279 इचलकरंजी मदन कारंडे

दरम्यान यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. लाडक्या बहि‍णींना निवडणुकीपुरतच गोंरजण्याचं काम सुरू आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल जे विधान करण्यात आलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. लाडक्या बहिणींना कसं वागवलं जात हे राज्यानं पाहिलं. कापूस आणि सोयाबिणचं मोठं नुकसानं झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मात्र महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, आज दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 26-10-2024