चिपळूण : चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या ७भाजप नगरसेवकांनी भाजप नेते तथा उपनगर परिषद निवडणूक संयोजक प्रशांत यादव, भाजप उतर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांच्यासमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत चिपळूणच्या स्मार्ट सिटीसंदर्भात चर्चा केली. यावर रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला.
न. प. निवडणुकीत भाजपच्या ११ उमेदवारांपैकी ७ नगरसेवकांनी विजय मिळवला. या भेटीवेळी भाजप उत्तर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शिक्षक संघटना जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भोबस्कर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष व नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेविका रसिका देवळेकर, वैशाली निमकर, रूपाली दांडेकर, अंजली कदम, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, माजी नगरसेवक विजय चितळे, पंचायत राज जिल्हा संयोजक योगेश शिर्के, अभिजित जागुष्टे, बापू कांबळी, कुणाल आंबेकर, प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज, विनोद चव्हाण उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 26/Dec/2025














