Uday Samant: ना. उदय सामंत यांच्यावर शुभेच्छांचा महापूर; वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरीत जनसागर लोटला

रत्नागिरी :
रत्नागिरीचे लाडके लोकनेते आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा आज ५० वा वाढदिवस (सुवर्ण महोत्सव) साजरा होत आहे. आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी रत्नागिरीतील त्यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी एकच गर्दी केली होती. रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या वाढदिवसाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.

शुभेच्छांसाठी तोबा गर्दी
ना. उदय सामंत यांचा आज पन्नासावा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. आज सकाळी ना. उदय सामंत हे रत्नागिरीतील आपल्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि सामान्य रत्नागिरीकर दाखल झाले होते. हातात पुष्पगुच्छ आणि चेहऱ्यावर आनंद घेऊन आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेत सामंत यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

संपूर्ण महाराष्ट्रात सेलिब्रेशन
रत्नागिरीत जसा उत्साह आहे, तसाच उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या औद्योगिक विकासात दिलेल्या योगदानामुळे त्यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, आपल्या ‘होम पिच’वर म्हणजेच रत्नागिरीत मिळालेले प्रेम पाहून उदय सामंत भारावून गेल्याचे चित्र होते.

युवकांचा मोठा सहभाग
विशेषतः तरुणाईमध्ये उदय सामंत यांची मोठी क्रेझ असून, अनेक तरुण कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात आपल्या नेत्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरही सकाळपासूनच उदय सामंत यांच्या फोटो आणि रिल्सचा पूर आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 26-12-2025