Lanja : बेकायदेशीर दारूसाठ्यासह रिक्षा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

लांजा : रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लांजा तालुक्यातील भांबेड फाटा येथे मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या प्रथमेश गोपीनाथ शेरे या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूसाठा आणि रिक्षासह एकूण २,०२,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:१६ वाजण्याच्या सुमारास वाटुळ ते दाभोळे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई करण्यात आली. प्रथमेश गोपीनाथ शेरे (वय २७ वर्ष, रा. भांबेड, गांगणवाडी, ता. लांजा) हा आपल्या ताब्यातील बजाज कंपनीच्या रिक्षातून (क्रमांक MH-08-E-7557) विनापरवाना दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना मिळून आला.

जप्त केलेला मुद्देमाल रिक्षा १,५०,००० रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची बजाज रिक्षा. दारूसाठा ५२,८०० रुपये किमतीच्या ‘मॅकडॉल नं. १’ व्हिस्कीच्या १८० मिलीच्या एकूण ४८ सीलबंद काचेच्या बाटल्या. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सत्यजित शिवाजी दरेकर यांनी फिर्याद दिली असून, २४ डिसेंबर रात्री ११:२४ वाजता लांजा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 26/Dec/2025