Guhagar : खोडदे गणेशवाडीत २२ जानेवारीला माघी गणेशोत्सव

गुहागर : खोडदे गणेशवाडी येथे माघी गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी गजानन प्रसादिक भजन मंडळ खोडदे, गणेशवाडी या मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यास ११,१११ रूपये व चषक, द्वितीय ७,७७७, तृतीय ५,५५५ रूपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची नावनोंदणी ११ जानेवारीपर्यंत करावी. नावनोंदणीसाठी गणेश साळवी, संजय साळवी, राजेंद्र चव्हाण यांच्याकडे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 26/Dec/2025