रत्नागिरी : वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, यांच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत निष्क्रिय ठेव रक्कम (अनक्लेम डिपॉजिट) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडियातर्फे २९ डिसेंबर रोजी देवरूख येथे सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजता पंचायत समिती सभागृह, देवरूख (बँक ऑफ इंडिया देवरूख शाखेच्या च्या समोर) येथे निष्क्रिय ठेव रक्कम शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये भारतीय रिझर्व बँकेचे मुंबई क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन दत्ताराम कानसे यांनी केले आहे.
निष्क्रिय ठेव रक्कम म्हणजे अशा ठेवी ज्या खातेदाराने दीर्घकाळ (१० वर्षांहून अधिक) वापरलेल्या नसतात अशा रकमा संबंधित बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे डिपॉजिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड या निधीत वर्ग करतात. या निधीतील रक्कम खातेदार अथवा त्यांचे वारसदार योग्य कागदपत्रांच्या आधारे परत मिळवू शकतात. या मोहिमेत सर्व बँका सहभागी होणार असून नागरिकांना त्यांच्या खात्यातील निधी परत मिळविण्यास मदत करण्यासाठी ही मोहिम आयोजित करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 26/Dec/2025














