Ratnagiri : बॅकेने जप्त केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : शहरातील नाचणे येथे पालिकेच्या हद्दीत असलेली मालमत्ता बॅंकेने जप्त केली होती. या मिळकतीत बेकायदेशीर रित्या प्रवेश केला. या प्रकरणी शहर पोलिस संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दानिश जमिर पटेल (वय ३, रा. राजनगर चर्मालय, मजगाव रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास नाचणे पालिकेच्या आत असलेल्या मिळकतीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दानिश पटेल यांची नाचणे पालिका हद्दीचा आत सर्वे नं ३९० हिस्सा नं १, ३, ५ सीटी सर्वे नं ७१७ ए-१३ ही मिळकत आहे. या दोन्ही मिळकती कोकण मर्कंटाल को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. शाखा धनजीनाका या बॅंकेकडून जप्त करण्यात आलेल्या होत्या. संशयिताने बॅंकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतीत बेकायदेशिर प्रवेश करुन मुख्य दरवाजाचे कुलप तोडून नुकसान केले तसेच सुरक्षा रक्षक प्रकाश बावधने यांनी अडविण्याचा प्रय़त्न केला असता त्याला मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी अख्तर फकीर महमद काझी (वय ५९, रा. पावस, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचेकडील आदेश व कार्यकारी दंडाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन केले व मिळकतीत बेकायदेशीररित्या प्रवेश करुन ताबा मिळवून बॅकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकऱणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 26/Dec/2025