Khed : पिरलोटे येथे कंपनीच्या ऑफिसमधून मध्यरात्री साहित्याची चोरी

खेड : तालुक्यातील पिरलोटे येथील पाण्याची टाकी जवळ असलेल्या ‘नोप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ या कंपनीच्या कार्यालयातून ऐन मध्यरात्री चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. विनय रंजन विवेकानंद उपाध्याय (वय ३६) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही चोरी दिनांक २४/१२/२०२५ रोजी रात्री ११:३० ते २५/१२/२०२५ रोजी पहाटे ००:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. पिरलोटे येथील पाण्याची टाकी जवळ असलेल्या कंपनीच्या ऑफिसमधून हे साहित्य चोरीला गेले आहे.

या घटनेची अधिकृत नोंद दिनांक २५/१२/२०२५ रोजी रात्री २२:५० वाजता करण्यात आली आहे. अंकुर अनजनाय श्रीवास्तव (राहणार पारस अपार्टमेंट, पिरलोटे; मूळ उत्तर प्रदेश) याने कंपनीच्या संमतीशिवाय, स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने कंपनीच्या कामकाजातील मौल्यवान साहित्याचा बॉक्स चोरून नेला आहे. यात चोरीला गेलेल्या माल मालः आरटी फिल्म, जॉईंट्सचा खाकी रंगाचा बॉक्स एकूण नगः १३५ जॉईंट्स. किमतः प्रत्येकी ६२० रुपये प्रमाणे एकूण ८४,००० रुपये आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. खेड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 26/Dec/2025