Khed : खडकवाडीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

खेड : तालुक्यातील खडकवाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. फिर्यादी दिनेश दिलीप पवार हे २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून ते २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:४५ वाजेपर्यंत घराबाहेर असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला.

कपाटात आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. चोरीला गेलेला मुद्देमालः सोन्याची चैनः सुमारे २ तोळे वजनाची (किंमत २,००,००० रुपये) सोन्याची अंगठीः सुमारे १ तोळे वजनाची (किंमत १,००,००० रुपये) रोख रक्कमः ६०,००० रुपये अशा प्रकारे एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. या प्रकरणी दिनेश पवार यांनी खेड पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 26/Dec/2025