◼️ प्रभाग ६ मधून मिळवला दणदणीत विजय; वुमन्स कार्निव्हलच्या यशस्वी संयोजिकेचा नवीन राजकीय प्रवास
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून विजय मिळवत नगरसेवकपदी विराजमान झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांनी आज ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक श्री. हेमंत वणजु यांची सदिच्छा भेट घेऊन आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे, मेधा कुलकर्णी आणि ‘रत्नागिरी खबरदार’ यांचे नाते जुने आणि अतूट आहे, ज्यामुळे या भेटीला एका कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
‘वुमन्स कार्निव्हल’च्या यशस्वी संयोजिका
मेधा कुलकर्णी या केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नाहीत, तर त्या ‘रत्नागिरी खबरदार’च्या महिला कमिटीच्या अत्यंत सक्रिय सदस्या आहेत. रत्नागिरीतील महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणाऱ्या आणि शहरात गाजलेल्या ‘वुमन्स कार्निव्हल’ (Women’s Carnival) या भव्य व्यावसायिक प्रदर्शनाच्या आयोजनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक नेहमीच झाले आहे. आता त्यांच्या रूपाने ‘रत्नागिरी खबरदार’च्या परिवारातील एक सदस्य पालिकेत गेल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.
कुलकर्णी परिवार आणि हेमंत वणजु यांचे जिव्हाळ्याचे संबंध
कुलकर्णी कुटुंब आणि संपादक हेमंत वणजु यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मेधा कुलकर्णी यांच्या विजयानंतर या ऋणानुबंधाला अधिकच उजाळा मिळाला. यावेळी हेमंत वणजु यांनी मेधा कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीप्रसंगी मेधा कुलकर्णी यांच्यासोबत भाजप नेते उमेश कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, ऋतुजा कुलकर्णी, आर्या कुलकर्णी आणि नीता वणजु उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 26-12-2025














