जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी फाटा क्र. २ येथील रस्त्याला थोर समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी उपसरपंच दिवंगत-गोविंद गोजू पवार मार्ग असे नामफलकाचे अनावरण गावच्या सरपंच दीप्ती वीर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी, ज्येष्ठ सदस्य सहदेव वीर, सूर्यकांत बंडबे, उदय अगोंडे, सदस्या वेदिका निंबरे, रिना वीर, माजी सदस्य यशवंत निंबरे, प्राथमिक शाळेचे शिक्षक राजकुमार जाधव, तसेच शुभदा महाडिक, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अनिल पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, सभापती प्रकाश पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कालकथित गोविंद पवार यांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विविध विकासात्मक कामांमध्ये फार मोठा वाटा होता. समाजातील गोरगरीब जनतेसाठी त्यांनी सामाजिक सेवेने व दानशूर भावनेने काम केले. गावातील विविध रस्ते तयार करणे, खडीकरण, डांबरीकरण, अशी कामे स्वतःला झोकून देऊन केली.
समाजातील परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची स्मृती व कार्य नव्या पिढीला माहिती व्हावे, यासाठी गावातील त्यांचे सहकारी ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालय कळझोंडी येथे झालेल्या ग्रामसभेत गोविंद गोजू पवार यांच्या गावासाठी दिलेले योगदान व त्यांचे कार्य नव्या पिढीला माहिती व्हावे, यासाठी या कळझोंडी मार्गाला थोर समाजसेवक गोविंद गोजू पवार मार्ग असे नाव देण्यात यावे, असा ठराव करण्यात आला. त्याप्रमाणे या फलकाचे अनावरण करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 26/Dec/2025














