Sangameshwar Railway Station : संगमेश्वर स्थानकावर पोरबंदर एक्स्प्रेसचे उत्स्फूर्त स्वागत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी पोरबंदर ते तिरुअनंतपूरम (२०९१०) या प्रवाशांकरिता शुक्रवारी दुपारी पहिल्यांदाच थांबलेल्या गाडीचे संगमेश्वरवासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर नियमित थांबणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना थांबे मिळावेत, यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यासाठी संगमेश्वरवासीयांनी संदेश जिमण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करीत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार पोरबंदर ते तिरुअनंतपूरम, तसेच जामनगर ते तिरूनेलवेली या दोन दूर पल्ल्याच्या गाड्यांना संगमेश्वर स्थानकावर प्रायोगिक थांबे मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार पोरबंदर ते तिरुअनंतपूरम या संगमेश्वर रोड स्थानकावर पहिल्यांदाच थांबलेल्या गाडीचे संगमेश्वरवासीय जनतेने उत्स्फूर्त स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 27/Dec/2025