रत्नागिरी : लो. बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे नोंदणीकृत महिला बचतगटामार्फत उपहारगृह कार्यान्वित करण्यासाठी निविदा ८ जानेवारी २०२६ पर्यंत मागविण्यात येत आहेत. नोंदणीकृत महिला बचत गटांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्राचार्य, शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गट निदेशक चंद्रशेखर राजाराम शिंदे, किंवा वसुधा प्रमोद पांचाळ यांच्याशी संपर्क साधावा.
संस्थेमध्ये ८८७ प्रशिक्षणार्थी व ५७कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेमध्ये उपहारगृह सकाळी ८.१५ ते सायंकाळी ४.४५ या वेळेत सुरू रहाणार आहे. २९ डिसेंबर ते ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत (सार्वजनिक सुट्टी, दुसरा व चौथा शनिवार वगळून) कोऱ्या निविदा मिळतील व स्वीकारण्यात येतील. ८ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत निविदा स्वीकरण्यात येतील व ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता निविदा उघडण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 27/Dec/2025














