रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या बिअर शॉपीच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, २५ डिसेंबर रोजी रात्री ८.४० वा. सुमारास करण्यात आली. वरद अशोक सोनावले (२४, रा. सह्याद्री नगर नाचणे, रत्नागिरी. मूळ रा. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस हवालदार महेंद्र खापरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री संशयित हा रेल्वे स्टेशन स्टॉपच्या मागील बाजूस असलेल्या बियर शॉपीच्या समोर मोकळ्या जागेत आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 27/Dec/2025