◼️ अत्याधुनिक फिचर्स आणि सेफ्टीचा ‘बाप’; एस.पी. ॲाटोहब तर्फे ग्राहकांना सोहळ्याचे निमंत्रण
रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून ज्या कारची संपूर्ण भारतभरातील ऑटोमोबाईल प्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, ती ‘दि लिजेंड टाटा सिएरा’ (The Legend Tata Sierra) आता रत्नागिरीत दाखल झाली आहे. लाँचिंगच्या आधीच ग्राहकांकडून भरभरून कौतुक होत असलेल्या या कारची आज, शनिवारी (दि. २७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातून वाजतगाजत ‘श्री भैरी दर्शन मिरवणूक’ काढण्यात येत आहे. कुवारबाव येथील एस.पी. ॲाटोहब (S.P. Autohub) शोरूम येथून सकाळी १० वाजता या मिरवणुकीची सुरुवात झाली आहे.
उद्या रविवार ठरला ‘अनावरण’चा दिवस!
टाटा सिएरा प्रेमींसाठी उद्याचा रविवार खास असणार आहे. दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी एस.पी. ॲाटोहब शोरूममध्ये टाटा सिएराचे अधिकृत अनावरण (Unveiling) होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून ही कार ग्राहकांसाठी आणि कार प्रेमींसाठी पाहण्यासाठी (Display) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
काय आहेत ‘टाटा सिएरा’ची खास वैशिष्ट्ये?
टाटा मोटर्सने या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचा अनोखा संगम साधला आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह मॅन्यूअल, डीसीए (DCA) आणि एएमटी (AMT) ट्रान्समिशनमध्ये ही कार उपलब्ध आहे.
टाटा सिएराचे ‘फर्स्ट इन क्लास’ फिचर्स:
एक्सटीरियर: कारला प्रीमियम लूक देणारे फ्लश डोअर हॅन्डल आणि रात्रीच्या प्रवासासाठी न्यू नाईट सेबर बाय एलईडी बुस्टर हेडलॅम्प्स (New Night Saber Bi-LED Booster Headlamps).
इंटेरियर: प्रीमियम ड्युअल टोन इंटिरियर आणि स्मार्ट स्टीरिंग.
इन्फोटेनमेंट: 31.24 HD हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल क्लस्टर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी होरायझन व्हियू ट्रिपल स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम.
कम्फर्ट: खडकाळ रस्त्यांवरही आरामदायी प्रवासासाठी सुपर ग्लाइड सस्पेन्शन (Super Glide Suspension).
सुरक्षिततेत नंबर वन: टाटाच्या परंपरेनुसार या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी मजबूत अरगोस प्लॅटफॉर्म (Argos Platform) आणि सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना आग्रहाचे निमंत्रण या ऐतिहासिक कारच्या स्वागत सोहळ्यात आणि अनावरण कार्यक्रमात रत्नागिरीतील ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एस.पी. ॲाटोहब आणि टाटा मोटर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 27-12-2025














