दापोली : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वच पर्यटन क्षेत्रांमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुरुडमध्ये पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मुरुड परिसरात बंदर विभागाच्या मालकीच्या जागेत करण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकामामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होत आहे.
मुरुड-दापोली मार्गावरून दररोज स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. मात्र, बेकायदेशीर बांधकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहनांची कोंडी होत असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुट्टीचे दिवस आणि पर्यटन हंगाम सुरू असल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. तर आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 27/Dec/2025














