Ratnagiri : बेपत्ता व्यक्तीविषयी माहिती देण्याचे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे आवाहन

रत्नागिरी : मोहम्मद आक्रम आन्सारी (वय ५२, रा. मु. पो. लाखपाळ, –तालुका माणगांव, जिल्हा रायगड) येथील रहिवासी असून वीर रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँड येथून १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बेपत्ता झाले आहेत. त्याची उंची ५ फूट ५ इंच, रंग गोरा, अंग – भक्कम, चेहरा -गोल, नाक – सरळ, डोकीचे केस बारीक, मिशी बारीक पांढरी, दाढी -पांढरी वाढलेली, नेसणीस ऑफ व्हाईट रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, गे रंगाची ट्रॅक पॅन्ट, पायात काळ्या रंगाची स्पार्क कंपनीची स्लीपर, डावा कान कानाला खालच्या बाजूस चिकटलेला अशी ओळख खूण आहे. या व्यक्तींबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिस उपनिरीक्षक रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे येथे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 27/Dec/2025