खेड : तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून गुरुवार (२५ डिसेंबर) रोजी सायंकाळी चार वाजता वाडी जैतापूर धनगरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून जीव घेतला. वाडी जैतापूरच्या धनगरवाडी येथील शेतकरी शांताराम धोंडू डोईफोडे यांच्या २ शेळ्यांचा बिबट्याने घराजवळच हा हल्ला केला. यामध्ये दोन्ही शेळ्या गतप्राण झाल्या. या घटनेची माहिती वाडी जैतापूरचे पोलिस पाटील बाळकृष्ण कासार यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 27/Dec/2025














