◼️ राहत्या घरातील बेडरुममध्ये घेतला गळफास; चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
चिपळूण/रत्नागिरी : चिपळूण (Chiplun) शहरातील पागमळा परिसरात खळबळ उडवून देणारी एक घटना समोर आली आहे. येथील ‘एकता रेसिडेन्सी’मध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आशिष किरण रोडगे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना २४ डिसेंबरच्या रात्री ते २५ डिसेंबरच्या सकाळी उघडकीस आली.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आशिष रोडगे हे चिपळूणमधील पागमळा येथील एकता रेसिडेन्सी, बी विंग, रूम नंबर ३०२ येथे राहत होते. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.०० वाजता ते २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आशिष रोडगे हे दारूच्या नशेत होते. त्यांनी आपल्या बेडरुममधील सिलिंग फॅनच्या दांडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
सकाळी प्रकार उघडकीस दुसऱ्या दिवशी (२५ डिसेंबर) सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिसांत नोंद
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (Accidental Death) म्हणून नोंद करण्यात आली आहे. बी.एन.एस.एस. (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ७६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या व्यसनापायी किंवा नशेत भान हरपल्याने हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 27-12-2025














